मगरपट्टा सिटीच्या भव्य आणि यशस्वी निर्मितीनंतर मधुवन या गृहप्रकल्पाचा शुभारंभ झाला. मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि. यांनी साबळे कन्स्ट्रक्शन्सच्या सहकार्याने साकारलेला हा दिमाखदार प्रकल्प, स्वप्नातलं घर बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी पुणेकरांसाठी घेऊन आला आहे.
हडपसरच्या जवळ आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सुविधासंपन्न मधुवन वसलेलं आहे. आवाक्यातल्या किंमतीतली इथली १ बीएचके घरं राहायला आनंददायक आणि गुंतवणुकीला लाभदायक अशी आहेत. खेळण्यासाठी मोकळ्या जागा, भरपूर हिरवाई व सुखकर जीवनशैलीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा 'मधुवन' मध्ये आहेत. त्यामुळे सुरक्षित परिसरातील सर्वसमावेशक जीवनशैलीचा आनंद आणि फायदे सामान्यांच्याही आवाक्यात आले आहेत.
ससाणे नगर, SRPF, मगरपट्टा सिटी व इतर प्रमुख लोकेशन्सशी उत्तमरीत्या जोडलेला हा प्रकल्प आहे. तेव्हा आता क्षणभरही उशीर करू नका. मधुवन मधलं दर्जेदार, मनपसंत घर बुक करून, पुण्यात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा.




MahaRERA registration number : P52100025448